शालेय शिक्षण विभागाचे आदेश; खाजगी शिकवणीला ही नियमांचा चाप अहिल्यानगर - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ...
शालेय शिक्षण विभागाचे आदेश; खाजगी शिकवणीला ही नियमांचा चाप
अहिल्यानगर - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेमध्ये समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ Mental Health Education यांची नियुक्ती सक्तीची केलेली आहे. तसेच राज्यातील सर्व शिक्षण संस्थांमध्ये अध्यापन व अध्यापन इतर कामे करणार्या कर्मचार्यांचे वर्षभरातून दोनदा प्रामाणित मानसिक आरोग्य तज्ज्ञ मार्फत प्रशिक्षण घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील प्रत्येक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना आता मानसिक आरोग्याचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक झाले आहे. दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने खाजगी शिकवणी चालकांना विरोधात देखील नियमांचा चाप आवळला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेल्या निकालानंतर राज्यातील शालेय शिक्षण विभागाने याबाबतचे आदेश काढले आहेत. यात यापुढे प्रत्येक शाळेतील शिक्षकांना वर्षभरातून दोनदा Mental Health Educationमानसिक आरोग्य प्रशिक्षणासोबत संबंधित प्रशिक्षणात मानसिक प्रथमोपचार धोक्याची लक्षणे ओळखणे, आत्महत्या प्रसंगावरील प्रतिसाद तसेच योग्य संदर्भ देण्याच्या कार्यपद्धतीचा समावेश सक्तीचा करण्यात आलेला आहे. यामुळे आता शाळांमधील शिक्षकांसह शिक्षकेतरांची जबाबदारी वाढणार आहे. त्यासोबत शालेय शिक्षण विभागाने खाजगी शिकवणी चालकांविरोधात नियम स्पष्ट केले असून यात प्रत्येक खाजगी शिकवणी वर्गाने त्यांचे अभ्यासक्रमाचे वेळापत्रक विद्यार्थ्यांना पुरेशी विश्रांती घेता येईल, अशा पद्धतीने तयार करावे, जेणेकरून त्यांच्यावर अतिरिक्त मानसिक ताण निर्माण होणार नाही. तसेच खाजगी शिकवणी वर्गात विद्यार्थी, तसेच शिक्षक प्रशिक्षक यांना आठवड्यातून किमान एक दिवस सुट्टी द्यावी, आठवड्याच्या सुट्टीच्या दुसर्या दिवशी कोणतेही मूल्यमापन चाचणी परीक्षा किंवा आकलन चाचणी घेण्यात येऊ नये, खाजगी शिकवणी वर्गणी त्यात्या ठिकाणच्या महत्त्वाच्या व लोकप्रिय सण उत्सवाच्या काळात खाजगी शिकवणी वर्गांना रजा जाहीर करावी, खाजगी शिकवणी वर्गांनी शिकवणी वर्गाचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी अतिरेकी ठरणार नाही, अशा पद्धतीने करावे, कोणतेही परिस्थितीत शिकवणी वर्ग एक दिवसात पाच तासापेक्षा अधिक नसावा.
खाजगी शिकवणीतही समुपदेशन सत्रांचे आयोजन
यापुढे खाजगी शिकवण्यांमध्ये देखील विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्यात यावे, या सत्रांमध्ये जीवन कौशल्य विकास वैज्ञानिक दृष्टिकोन पुराव्यावर आधारित विचारप्रणाली सर्जन सर्जनशीलता व नाविन्यपूर्ण उपक्रम शारीरिक तंदुरुस्ती आरोग्य व मानसिक कल्याण वयोगटानुसार आव्हाने, प्रेरणा सहकार्य संघभावना समस्या निराकरण नैतिक व मूल्यधिष्टता निर्णय क्षमता वैयक्तिक सुरक्षितता मूलभूत कर्तव्य नागरिकत्व, कौशल्य पर्यावरण जनजागृतीमध्य तंबाखू व इतर व्यसनाच्या हानिकारक परिणामांबाबत समुपदेशन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
...................

COMMENTS