तब्बल 5 हजार 100 जणांनी घेतला ना हरकत दाखला अहिल्यानगर (प्रतिनिधी) - निवडणुकीच्या निमित्ताने अहिल्यानगर महापालिका मालामाल झाली आहे. 15 दिवसा...
तब्बल 5 हजार 100 जणांनी घेतला ना हरकत दाखला
अहिल्यानगर (प्रतिनिधी) -निवडणुकीच्या निमित्ताने अहिल्यानगर महापालिका मालामाल झाली आहे. 15 दिवसांत दोन कोटी 86 लाख घरपट्टी, पाणीपट्टीसह अन्य देणीची वसुली महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. जी वसुली कर्मचार्यांकडून होत नव्हती. ती महापालिका निवडणुकीमुळे झाली आहे.
निवडणूक लढविणारे उमेदवार तसेच सूचक व अनुमोदकांची महापालिकेची थकबाकी असता कामा नये, यामुळे निवडणुकीस उभे राहणार्या इच्छुकांनी आपल्या सुचक व अनुमोदकांसह महापालिकेची होती नव्हती ती थकबाकी जमा केली आहे.ही वसुली जमा झाल्यानंतर महापालिकेकडून ना हरकत दाखल देण्यात येतो. तो दाखल नसेल तर निवडणुकीला उभे राहत येत नाही. या 15 दिवसात सुमारे 5 हजार 100 जणांनी ना हरकत दाखल घेतला असून त्यातून सुमारे दोन कोटी 86 लाख रुपये वसुली झाली आहे.
मागील 15 दिवस महापालिकेतील वसुली विभाग उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गजबजून गेला होता. महापालिका निवडणुकीसाठी दि. 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. अर्थात दि. 15 डिसेंबरला महापालिका निवडणुकीची घोषणा झाली होती. त्यानंतर लगेच इच्छूक कामाला लागले होते. सुरवातीला महापालिकेकडील थकबाकी भरण्यास प्रारंभ करण्यात आला. दि. 16 डिसेंबर ते दि. 30 डिसेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ना हरकत दाखल घेण्याची प्रक्रिया सुरू होती. ना हरकत दाखल हा महापालिकेतील अनेक विभागाकडून घ्यावा लागतो. मात्र त्यात प्रामुख्याने थकबाकी जमा करून तो ना हरकत दाखल महत्वाचा आहे. तो नसेल तर निवडणूक लढता येत नाही. त्यामुळे इच्छूकांनी ती थकबाकी जमा केली. विशेष म्हणजे इच्छूकांनी आपल्यास सुचक व अनुमोदक यांची देखील थकबाकी जमा करून ना हरकत दाखल घेतला आहे.

COMMENTS