आठव्या वेतन आयोगाकडे फिटमेंट फॅक्टरचा प्रस्ताव नवी दिल्ली - आठव्या वेतन आयोगाची 8th Pay Commission घोषणा झाल्यापासून सर्वांनाच वाढणार...
आठव्या वेतन आयोगाकडे
फिटमेंट फॅक्टरचा प्रस्ताव
नवी दिल्ली - आठव्या वेतन आयोगाची 8th Pay Commission घोषणा झाल्यापासून सर्वांनाच वाढणार्या पगाराची उत्सुकता लागून राहिली आहे. नेमका पगार किती वाढणार आणि कशा पद्धतीने वाढणार, याबाबत तर्क लढवले जात आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार शिपायाचा बेसिक पगार 18 हजार रुपयांवरुन 58 हजार 500 रुपये होणार आहे. बाकीचे अलाउन्सेस मिळून हा पगार लाखांपेक्षाही पुढे जाऊ शकतो. Government Employee
आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 3.0 टक्क्यांनी वाढवून 3.25 करण्याची आणि वार्षिक 5 टक्के वाढ करण्याची मागणी केली आहे. जर हा प्रस्ताव मान्य केला तर वर्ग चार आणि वर्ग तीनच्या कर्मचार्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. उदाहरणासाठी आपण शिपायाचा पगार बघू. शिपायाला 18 हजार रुपये पगार असेल तर 3.25 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यानंतर बेसिक वेतनामध्ये वाढ होऊन ते 58 हजार 500 रुपये इतका पगार वाढू शकतो. जर हाच फॉर्म्युला लेव्हल 1 ते लेव्हल 18 म्हणजे आयएएस अधिकार्यांना लागू झाला तर त्यांचा पगारही भरमसाठ वाढू शकतो.
आठराव्या लेव्हलचा विचार केला तर ही कॅबिनेट सेक्रेटरी लेव्हल आहे. यामध्ये सध्या बेसिक पे 2 लाख 50 हजार रुपये आहे. जर 3.25 फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर 8 लाख 12 हजार रुपये बेसिक पे मिळेल. त्यात इतर भत्ते वगैरे मिळून पगार भरमसाठ वाढू शकते. मात्र सरकार मोठ्या पगारांच्या कर्मचार्यांबाबत काय निर्णय घेतं, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.
एफएनपीओने आपल्या शिफारशी नॅशनल काऊन्सिल जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीला पाठवल्या आहेत. संघटनेचे महासचिव शिवाजी वासिरेड्डी म्हणाले की, आठवा वेतन आयोग लागू केला जणार असल्याने आम्ही मागण्या मांडल्या आहेत. 25 फेब्रुवारी 2025 रोजी छउ-गउच् बैठक होणार आहे. त्यानंतर आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष रंजना प्रकाश देसाई यांच्याकडे शिफारशी पाठवण्यात येणार आहेत.

COMMENTS