2019 नंतर मुहूर्त; मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांचा पुढाकार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गेल्या काही वर्षापासून झेडपी (जिल्हा परिषद) कर्मच...
2019 नंतर मुहूर्त; मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांचा पुढाकार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)-
गेल्या काही वर्षापासून झेडपी (जिल्हा परिषद) कर्मचार्यांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धा अधिकारी आणि कर्मचार्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी, त्यांच्यातील सांघिक भावना वाढवण्यासाठी आणि सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी महत्त्वपूर्ण असता. मात्र, नगर जिल्ह्यात कोविडच्या आधी 2019 ला अशा स्पर्धा झाल्या होत्या. त्यानंतर या स्पर्धांना बेक्र लागला होता. मात्र, यंदा जिल्हा परिषद कर्मचार्यांसाठी क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार असून त्यासाठी संक्रातीनंतरचा मुहूर्त साधण्यात येणार आहे.
गेल्या पाच ते सहा वर्षानंतर होणार्या स्पर्धासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांना कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या आहेत. पुढील आठवड्यात मकरसंक्रांत आणि त्यानंतर महापालिका निवडणूक यामुळे त्यानंतर जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या क्रीडा स्पर्धा पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
या क्रीडा स्पर्धाच्या माध्यमातून कर्मचारी व अधिकारी यांच्यात शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढावे, कर्मचार्यांना निरोगी आणि खंबीर बनवणे, त्यांच्यात सांघिक भावना, तसेच एकजूट निर्माण करणे, त्यांच्या कलागुणांना वाव, कर्मचार्यांच्या सुप्त कलांना प्रोत्साहन देणे व तणावमुक्ती: कामाच्या ताणातून आराम मिळवणे, यासाठी या स्पर्धाचा उपयोग होणार असल्याचे उपमुख्य अधिकारी शेळके यांनी सांगितले.
....................
महानगर पालिका निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर लगेच या स्पर्धा होणे आवश्यक आहे. अन्यथा जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू असून या निवडणूका जाहीर झाल्यास यंदा कर्मचार्यांच्या क्रीडा स्पर्धांची संधी हुकण्याची शक्यता आहे.
....................

COMMENTS