मुंबई महापालिकेत महापौरपदासाठी गूढ वाढलं ! मुंबई - महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर कोण होणार, या प्रश्नाने शहरातील राजकीय वातावरण ताप...
मुंबई महापालिकेत महापौरपदासाठी गूढ वाढलं !

मुंबई - महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर कोण होणार, या प्रश्नाने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. 227 जागांच्या सभागृहात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती बहुमतात असली, तरी पद वाटपावरून गूढ निर्माण झाले आहे. भाजपला 89 जागा मिळाल्या, शिंदे गटाच्या सेनेला 29, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना (यूबीटी)ला 65 जागांसह दुसरा क्रमांक मिळाला. सर्वाधिक जागा असणार्या पक्षाला महापौरपद मिळणे बंधनकारक नसले, तरी शिंदे हे पद हस्तगत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची कुजबुज सुरू आहे.
मातोश्रीवर नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन करताना उद्धव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. ते म्हणाले की, भाजपने कागदोपत्री शिवसेना संपवल्याचा दावा केला, पण प्रत्यक्षात ते असफल झाले. पैशाने निष्ठा खरेदी करता येत नाही, असा टोला त्यांनी लगावला. भाजपने विश्वासघात करून निवडणुका जिंकल्या, मुंबईला गहाण टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप उद्धव यांनी केला. मराठी माणूस हा विश्वासघात विसरू शकत नाही, असे ते म्हणाले. आमचे ध्येय आहे की शिवसेनेचा महापौर निवडून यावा; देवाची इच्छा असेल तर ते घडेलच.
उद्धव ठाकरे म्हणाले, जे नगरसेवक एकदा पक्ष सोडून गेले, ते पुन्हा तसे करू शकतात. शिंदे गटातून निवडून आलेले अनेक जण मूळ शिवसेना (यूबीटी)चे होते, भाजप महापौरपदासाठी पक्षांतर घडवण्याची शक्यता आहे. सत्ता वाटपाच्या चर्चेत शिंदे गटाने पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी केली आहे. शनिवारी शिंदे गटाच्या सेनेने नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबईतील एका हॉटेलमध्ये हलवले, ज्यामुळे नव्या अफवांना उधाण आले. पक्ष नेत्यांनी स्पष्ट केले की, निवडणुकीनंतर नगरसेवकांना आराम देण्यासाठी आणि कार्यक्रमासाठी हे पाऊल उचलले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षांतराच्या चर्चा नाकारल्या आणि मुंबईला एकमताने ममहायुती महापौरफ मिळेल, असे आश्वासन दिले. ते म्हणाले, एकनाथ शिंदे, मी आणि दोन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून मुंबईच्या महापौराबाबत आणि किती कालावधीसाठी याबाबत फैसला घेऊ. कोणताही वाद उद्भवणार नाही. सर्व काही व्यवस्थित पार पडेल. एकत्रितपणे मुंबई कुशलतेने चालवू. महापौर निवडणूक 28 जानेवारी 2026 रोजी होण्याची शक्यता आहे. विशेष सभा बोलावल्यानंतर महापालिका सचिव आणि आयुक्त निर्णय घेतील. नगरसेवकांच्या मतदानातून महापौर निवडला जाईल. ज्याला जास्त मते मिळतील, तो महापौर आणि उपमहापौर म्हणून जाहीर होईल, असे एका अधिकार्याने नमूद केले.
पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपद
सेनेच्या पदाधिकार्यांनी म्हटले की, सत्ता वाटपात पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपद हवे, कारण भाजपकडे स्वतंत्रपणे महापौर नियुक्त करण्याइतक्या जागा नाहीत आणि पदांचे वाटप करावे लागेल. त्याचबरोबर, महत्वाच्या समित्यांच्या पदांमध्ये, जसे की स्थायी समितीच्या अध्यक्षपदात, योग्य प्रमाणात हिस्सा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
विरोधकांकडे सत्ताधारी युतीला टक्कर देण्याइतके संख्याबळ?
उद्धव ठाकरे यांच्या मदेवफ मदत करेल या उल्लेखावर फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले की, त्यांना मदेवाफ म्हणतात आणि वरचा देवाने महायुतीचा महापौर होणार असा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, शिवसेना (यूबीटी)चे खासदार संजय राऊत यांनी म्हटले की, विरोधकांकडे सत्ताधारी युतीला टक्कर देण्याइतके संख्याबळ आहे, पण लोकशाहीचा सन्मान करू.
COMMENTS