6 ते 8 फेबु्रवारीदरम्यान क्रीडा स्पर्धा; वैयक्तीक स्पर्धांसह सांघिक खेळाचे आयोजन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कोविडपासून खंड पडलेल्या जिल्हा परि...
6 ते 8 फेबु्रवारीदरम्यान क्रीडा स्पर्धा; वैयक्तीक स्पर्धांसह सांघिक खेळाचे आयोजन

या स्पर्धासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी पुढाकार घेतला. यापूर्वी दरवर्षी जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या हिवाळ्यात क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन करण्यात येत होते. मात्र, 2020 मध्ये कोविडपासून या स्पर्धामध्ये खंड पडला. तेव्हापासून या स्पर्धा झालेल्या नव्हत्या. मात्र, यंदा स्पर्धेला मुहूर्त लागला आहे. अनेक वर्षाच्या खंडानंतर होणार्या क्रीडा स्पर्धासाठी जिल्हा परिषद कर्मचारी देखील उत्सूक आहे.
या क्रीडा स्पर्धेत क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, बुध्दीबळ, बॅटमिंटन (एकेरी व दुहेरी), पोहणे, कॅरम, धावणे (100, 200, 400 मीटर), बास्केट बॉल, भालाफेक यासह सांघिक प्रकरातील सर्व स्पर्धा पारपडणार आहेत. या स्पर्धातील खेळाच्या प्रकारानूसार नियोजनाची जबाबदारी प्रत्येक विभागाकडे सोपवण्यात येणार आहे. त्याचे वेळापत्रक तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.
45 वर्षावरील स्वतंत्र टीम
कर्मचार्यांच्या या क्रीडा स्पर्धेत 45 वर्षावरी कर्मचार्यांसाठी स्वतंत्र टीम करण्यात येणार आहेत. जादा वय असणार्या कर्मचार्यांचा तरूण कर्मचार्यांशी स्पर्धा लावण्यापेक्षा समवयस्कर कर्मचार्यांच्या विविध स्पर्धाच्या स्वतंत्र टिम तयार करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
COMMENTS