वीरगाथा 5.0 राष्ट्रीय स्पर्धेत जिल्हा परिषद शाळेची उज्वल कामगिरी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या वतीने आयोजि...
वीरगाथा 5.0 राष्ट्रीय स्पर्धेत जिल्हा
परिषद शाळेची उज्वल कामगिरी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या वतीने आयोजित वीरगाथा 5.0 राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा, माथणी (ता. अहिल्यानगर) येथील मंजुश्री सुधीर घोरपडे (इयत्ता तिसरी) हिने निबंध लेखन स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल जिल्हा परीष्य मराठी शाळा माथणी येथे सन्मान करण्यात आला.
इयत्ता तिसरी ते पाचवी या गटामधून मंजुश्रीची राष्ट्रीय स्तरावरील सुपर 100 विजेत्यांमध्ये निवड झाली. पहिल्या 21 विद्यार्थ्यांमध्ये तिने स्थान मिळवले आहे. ही अहिल्यानगर जिल्ह्यासाठी तसेच जिल्हा परिषद शाळांसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी देशभरातून तब्बल 1 कोटी 92 लाख 48 हजार 9विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या प्रचंड स्पर्धेतून निवड होणे हे कु. मंजुश्रीच्या बुद्धिमत्ता, लेखन कौशल्य आणि देशभक्तीपर विचारांचे द्योतक आहे. निवड झालेल्या सुपर 100 विजेत्या विद्यार्थ्यांचा 26 जानेवारी नवी दिल्ली येथे भारताचे संरक्षण मंत्री यांच्या हस्ते भव्य समारंभात गौरव करण्यात येणार आहे. या यशामागे विद्यार्थिनीचे मार्गदर्शक मुख्याध्यापक सुनील अडसूळ, शिक्षक राहुल व्यवहारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यार्थिनीचे पालक, शालेय व्यवस्था
पन समिती आणि संपूर्ण शिक्षकवृंद यांचे सहकार्य उल्लेखनीय ठरले आहे. मंजुश्रीच्या या यशामुळे जिल्हा परिषद शाळा, माथणीचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही मोठा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. तिच्या या यशाबद्दल जिल्हा परिषद मराठी शाळा माथणी विद्यालयात सत्कार करण्यात आला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंजाबापू घोरपडे, विस्तार शिक्षणाधिकारी कापरे साहेब, कारले सर, सरपंच डॉ. विलास घोरपडे, अण्णासाहेब जगताप, विलास कारभारी घोरपडे, विकास घोरपडे, उपसरपंच अशोक कांडेकर पैलवान युवराज करंजुले, मयूर घोरपडे उपस्थित होते.

COMMENTS