सोन्यांच्या दरात गुरूवारी 11,486 रुपयांची वाढ मुंबई (प्रतिनिधी)- लग्नांचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सराफा बाजारात सोन्या-चांदीची विक्रमी घो...
सोन्यांच्या दरात गुरूवारी 11,486 रुपयांची वाढ
मुंबई (प्रतिनिधी)- लग्नांचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सराफा बाजारात सोन्या-चांदीची विक्रमी घोडदौड सुरू आहे. सोन्या-चांदीनं जुने सर्व रेकॉर्ड मोडीत काढत नवीन शिखर गाठलंय. बुधवारी असलेल्या बंद भावाच्या तुलनेत, 24 कॅरेट सोन्याच्या दरात गुरूवारी 11,486 रुपयांची प्रचंड वाढ झाली आहे. तर चांदीनं 27,666 रुपयांची मोठी उडी घेतली आहे. या दरवाढीनंतर जीएसटीसह चांदीचा भाव 3,97,510 रुपये प्रति किलोवर पोहोचला, तर 24 कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह 1,81,404 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. प्लॅटिनमच्या दरातही 6,750 रुपयांची वाढ होऊन तो 89,990 रुपयांवर पोहोचला आहे.
आयबीजेएने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या केवळ 4 कामकाजाच्या दिवसांत चांदी 8,622 रुपयांनी तर सोनं 24,993 रुपयांनी महागलं आहे. या वर्षाच्या सुरुवातीच्या 29 दिवसांचा विचार केल्यास, चांदी 1,93,908 रुपयांनी तर सोन्याचा भाव 38,044 रुपयांनी वाढला आहे.
सोन्याचे कॅरेटनुसार सुधारित दर (जीएसटीसह)
23 कॅरेट गोल्ड: 11,440 रुपयांच्या वाढीसह जीएसटीसह याचा भाव 1,80,678 रुपये झाला आहे.
22 कॅरेट गोल्ड: 10,521 रुपयांनी महाग होऊन जीएसटीसह याचा दर 1,66,166 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला.
18 कॅरेट गोल्ड: 8,615 रुपयांच्या तेजीसह जीएसटीसह हा दर 1,36,053 रुपये प्रति 10 ग्रॅम झालाय.
14 कॅरेट गोल्ड: 6,719 रुपयांच्या वाढीनंतर जीएसटीसह याची किंमत 1,06,121 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली.

COMMENTS