पंचायत समितीसाठी 6 लाखांची मर्यादा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील 12 जिल्हा परिषद ( Zilla Parishad ) आणि 125 पंचायत समितींच्या ( Panch...
पंचायत समितीसाठी 6 लाखांची मर्यादा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील 12 जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि 125 पंचायत समितींच्या (Panchayat Samiti) निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार, राज्यात 5 फेब्रुवारी रोजी मतदान election होणार असून 7 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होईल. त्यामुळे, गेल्या काही महिन्यांपासून तयारीत असलेल्या उमेदवारांकडून आता निवडणुकांसाठी कागदपत्रे जमवाजमवी आणि उमेदवारी मिळवण्यासाठी शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निवडणुकांची घोषणा करताच आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. तसेच, उमेदवारांसाठी अर्ज भरण्याचा निवडणूक कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. आता, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना खर्चाची मर्यादा किती असेल हेही आयोगाने स्पष्ट केलं आहे.
निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषदा (Zilla Parishad) व पंचायत समित्यांच्या (Panchayat Samiti) निवडणुकांसाठी उमेदवारांना खर्च मर्यादा देण्यात आली आहे. त्यानुसार, 71 ते 75 निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी 9 लाख आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांसाठी 6 लाख रुपये खर्च मर्यादा असेल. तर, 61 ते 70 निवडणूक विभाग असेल्या जिल्हा परिषदांसाठी 7 लाख 50 हजार आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांसाठी 5 लाख 25 हजार रुपये खर्च मर्यादा असेल. तसेच, 50 ते 60 निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी 6 लाख आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांसाठी 4 लाख 50 हजार रुपये खर्च मर्यादा असणार आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती यांच्या निवडणुकांची घोषणा आज करण्यात आली. त्यानुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, छ. संभाजीनगर, परभणी, धाराशिव, कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुका होत आहेत. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी 16 जानेवारी ते 21 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
राज्यातील एकूण 12 जिल्हा परिषदांसाठी निवडणूक
एकूण जागा- 731
महिलांसाठी जागा- 369
अनुसूचित जातींसाठी जागा- 83
अनुसूचित जमातींसाठी जागा- 25
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा- 191
पंचायत समित्यांच्या जागांचा तपशील
एकूण पंचायत समित्या- 125
एकूण जागा- 1,462
महिलांसाठी जागा- 731
अनुसूचित जातींसाठी जागा- 166
अनुसूचित जमातींसाठी जागा- 38
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा- 342
निवडणूक कार्यक्रम तारखेनुसार
जिल्हाधिकार्यांकडून निवडणूक कार्यक्रमाच्या सूचनेची प्रसिद्धी- 16 जानेवारी 2026
नामनिर्देशनपत्र स्वीकारणे- 16 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026
नामनिर्देशनपत्रांची छाननी- 22 जानेवारी 2026
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत- 27 जानेवारी 2026
निवडणूक चिन्ह वाटप- 27 जानेवारी 2026
अंतिम उमेदवारांची यादी- 27 जानेवारी 2026
मतदानाचा दिनांक- 5 फेब्रुवारी 2026
मतदानाचा निकाला-7 फेब्रुवारी 2026

COMMENTS