दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा मुद्दाम काहीजण घडवू पाहत आहेत पुणे- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्...
दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा मुद्दाम काहीजण घडवू पाहत आहेत
पुणे- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. (Maharashtra First Women DCM Of Maharashtra) सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी पार पडणार आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहेत. मात्र या शपथविधी सोहळ्यापासून शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दुर ठेवण्यात आल्याचं चित्र आहे. अजित पवारांच्या निधनाआधी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन्ही पक्ष आघाडी करून लढवत होते. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा देखील होत होती अशी माहिती आहे, दरम्यान आता घडत असलेल्या घडामोडी आणि आज होणारा शपथविधी याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
सुनेत्रा पवार यांना इतक्या लवकर तात्काळ गट नेते निवड आणि उपमुख्यमंत्री पदावर निवड हा अंतिम निर्णय एनसीपी कोअर टीमचाच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा मुद्दाम काहीजण घडवू पाहत असल्यानेच इतक्या घाईत सुनेत्रा पवार यांची निवड करण्याच्या हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. एनसीपी कोअर टीम आणि सुनेत्रा पवार यांच्या सहमतीनेच सीएम यांची भेट घेत शपथविधी लवकर करण्याची भूमिका एनसीपी कोअर टीमची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुनेत्रा पवार यांना डीसीएम करणे आणि एनसीपी पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष करणे ही भूमिका प्रफुल पटेल, सुनीव तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्याच भूमिकेतून मांडली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
पार्थ पवार राज्यसभेवर जाणार?
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर रिक्त राज्यसभेच्या जागेवर पार्थ पवारांचा दावा असल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाच्या दुसर्या फळीतील नेत्यांसमोर पार्थ पवार यांनी आपली भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती आहे. पार्थ पवार यांना राज्यसभेची संधी मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर सुनिल तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ या नेत्यांनी शरद पवारांच्या पक्षासोबत या शपथविधी सोहळ्याबद्दल कोणतीही चर्चा केलेली नाही. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षात आणि एकुणच पवार कुटुंबात नाराजी असल्याचं बोलल्याच दिसून येतंय. काल बारामतीत अजित पवारांच्या रक्षा विसर्जनाचा विधी पार पडला. या विधीसाठी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र होत्या. त्यानंतर दोघी वेगवेगळ्या दिशेने गेल्या. त्यानंतर राजकीय घडामोडींना मुंबईत वेग आला आणि सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री बनणार यावर शिक्कामोर्तब झाले. यादरम्यान सुनेत्रा पवार यांची शरद पवारांसोबत भेट झालेली नाही. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी संवाद न साधल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चाला खोडा लागल्याचं बोललं जात आहे.
शपथविधीपूर्वी राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक
सदर शपथविधीपूर्वी दुपारी 2 वाजता विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली जाईल. या बैठकीबाबत सुनील तटकरे यांनी विधिमंडळात पक्षाचं अधिकृत पत्रही दिलं आहे. दरम्यान आजच्या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार (र्डीपशीींर झरुरी जरींह जष ऊर्शिीीूं उहळशष चळपळीींशी) बारामतीहून मुंबईत दाखल झाल्या आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल.

COMMENTS