पुन्हा ढगाळ वातावरण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील अनेक भागात मंगळवार 6 जानेवारी (अंगारकी चतुर्थीपर्यत) जाणवलेल्या किरकोळ थंडीनंतर आजप...
पुन्हा ढगाळ वातावरण
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील अनेक भागात मंगळवार 6 जानेवारी (अंगारकी चतुर्थीपर्यत) जाणवलेल्या किरकोळ थंडीनंतर आजपासून पुढील 2 दिवस म्हणजे शुक्रवार 9 जानेवारीपर्यत मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात माफक थंडी जाणवणार आहे. तसेच भोगीच्या दरम्यान दोन दिवस खांदेश, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे.
याबाबत पुण्याचे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, सध्या मुंबईसह कोकणात 17 ते 21 तर उर्वरित महाराष्ट्रात 9 ते 12 अंश से. दरम्यान किमान तापमान जाणवणार आहे. परंतु सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बुलढाणा येथे मात्र 12 अंशापेक्षा अधिक किमान तापमानाची नोंद होवू शकते. यानंतर म्हणजे शनिवार 10 जानेवारी ते बुधवार 14 जानेवारी (मकर संक्रांती) पर्यंतच्या पुढील पाच दिवसात पहाटेच्या किमान तापमानात काहीशी वाढ होवून थंडी कमी जाणवेल.
दरम्यान, भोगी (13 जानेवारी) अगोदर म्हणजे सोमवार-मंगळवार 12-13 जानेवारीच्या दोन दिवसात खांदेश, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची शक्यता जाणवते. तर पुणे, सातारा, कोल्हापूर अश्या 3 जिल्ह्यात ढगाळ वातावरणासहित झालाच तर अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.

COMMENTS