अहिल्यानगर (प्रतिनिधी) - अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पाच नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून त्यांच्या निवडीची केवळ औपचारिक घ...
अहिल्यानगर (प्रतिनिधी) - अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पाच नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून त्यांच्या निवडीची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. मात्र, राज्यभरात नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने संबंधित महापालिकांकडून सविस्तर माहिती मागविली होती. त्यानुसार अहिल्यानगर महापालिकेच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकार्यांनी संपूर्ण माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केल्याचे आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी महापालिका यशवंत डांगे यांनी सांगितले.
अहिल्यानगर महापालिकेचे पाच जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या बिनविरोध नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कुमार वाकळे व प्रकाश भागानगरे, भाजपच्या पुष्पा बोरूडे, सोनाबाई शिंदे व करण कराळे यांचा समावेश आहे. या सर्वांच्या निवडीची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. बिनविरोध निवडीनंतर आता महापालिकेच्या उर्वरित 63 जागांसाठी 283 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक अर्जांच्या छाननीदरम्यान शिवसेना (शिंदे गट) च्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद ठरले होते. त्यानंतर अर्ज माघारीच्या प्रक्रियेत शिवसेना तसेच महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी माघार घेतल्याने काही प्रभागांमध्ये बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
अहिल्यानगरप्रमाणेच राज्यातील अनेक महापालिकांमध्ये बिनविरोध निवडींचे प्रमाण वाढल्याने त्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने सर्व महापालिकांच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकार्यांकडून बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांची सविस्तर माहिती मागविली होती. त्यानुसार अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकार्यांनी आवश्यक ती माहिती आयोगाकडे सादर केली असून पुढील कार्यवाही आयोगाच्या पातळीवर होणार आहे.

COMMENTS