गुलाबराव पाटलांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य जळगाव - राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर झाला. महापालिका निवडणुक...
गुलाबराव पाटलांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
जळगाव - राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर झाला. महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपा आणि शिंदे सेनेच्या युतीला मोठं यश मिळालं. या महापालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी नेत्यांच्या सभा सुरू आहेत.
या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जळगावमधील एका सभेत बोलताना शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्याची मोठी चर्चा रंगली आहे. ङ्गतुमची बायको हेमा मालिनी आहे असं समजाफ, असं वादग्रस्त वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. मतदानाचा हक्क पदाधिकार्यांना समजावून सांगताना गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राजाच्या पोटी आता राजा जन्माला येत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भिल्लाला देखील एक मत देण्याचा अधिकार दिला आणि टाटा बिर्ला, अंबानी यांना देखील एक मत देण्याचा अधिकार दिला. हेमा मालिनीला सुद्धा एक मत देण्याचा अधिकार दिला आणि (मंचावरील पदाधिकार्याला उद्देशून) तुमच्या बायकोलाही एक मत देण्याचा अधिकार दिला. त्यामुळे मतदानाच्या दिवशी तुमची बायको हेमा मालिनी आहे असा समजा, असं वादग्रस्त वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
................
गुलाबराव पाटलांनी याआधीही केलं होतं वादग्रस्त वक्तव्य
2021 मध्ये एका सभेत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले होते की, माझं आव्हान आहे 30 वर्ष राहिलेल्या आमदाराला, माझ्या धरणगावला या आणि तिथले रस्ते पाहा. सगळे रोड-रस्ते अभिनेत्री हेमा मालिनींच्या गालासारखे केले आहेत. जर रस्ते तसे नसतील तर राजीनामा देऊन टाकेन. महाराष्ट्राला ज्ञान काय शिकवताय, पहिले बोदवडचा रस्ता तरी चांगला करा. हा योगायोग आहे की या जळगाव जिल्ह्याचं भाग्य खूप चांगलं राहिलंय. इथला कोणताही आमदार मंत्री झाल्यावर पाण्याचीच खाती मिळाली. एकनाथ खडसे जलसंपदा मंत्री, गिरीश महाजन जलसंपदा मंत्री आणि गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री झाले, असं गुलाबराव पाटील सभेत बोलताना म्हणाले होते.

COMMENTS