सकाळी काटेवाडीत, विद्या प्रतिष्ठान मैदानात दादांना अखेरचा निरोप पुणे- बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनानंतर अ...
सकाळी काटेवाडीत, विद्या प्रतिष्ठान मैदानात दादांना अखेरचा निरोप
पुणे- बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. या विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून एआयबीची टीम विमान अपघातस्थळाला भेट देऊन चौकशी करेल. ही टीम दिल्लीहून बारामतीला रवाना झाली आहे.
बारामती येथील विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्यासह त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव, फ्लाईट असिस्टंट पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर आणिकॅप्टन शांभवी पाठक अपघातात मृत्यूमुखी पडले. महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभाग (प्रोटोकॉल) नुसार, गुरुवारी (29 जानेवारी) सकाळी 11 वाजता पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. राज्यात तीन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. बारामतीमध्ये लँडिंग होण्यापूर्वीच अजित पवार यांचे विमान कोसळले. अजित पवार आज (28 जानेवारी) बारामतीमध्ये तीन जाहीर सभांना उपस्थित राहणार होते.
दरम्यान, अजित पवार यांचे पार्थिव बारामती वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आले होते. तिथं अभूतपूर्व गर्दी झाली होती. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानमध्ये आणण्यात आलं. याठिकाणी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आलं असून आज रात्री 10 वाजेपर्यंत विद्या प्रतिष्ठानमध्ये अंत्यदर्शन घेता येईल. उद्या सकाळी 6 ते 9 त्यांच्या मुळगावी काटेवाडी इथं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी अकरा वाजता विद्या प्रतिष्ठानमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.
बारामती विमान अपघातात काय काय घडलं?
दिल्लीस्थित व्हीएसआर व्हेंचर्सद्वारे चालवले जाणारे लिअरजेट 45 विमान सकाळी 8.10 वाजता मुंबईहून उड्डाण केले आणि सकाळी 8:45 वाजता रडारशी संपर्क तुटला.
डीजीसीएच्या एका अधिकार्याने सांगितले की, विमानात पाच जण होते.एका पोलिस अधिकार्याने सांगितले की, विमान सकाळी 8:50 वाजता कोसळले.अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या घड्याळावरून पटली.बारामती विमान अपघातात पायलट कॅप्टन सुमित कपूर आणि सह-पायलट कॅप्टन शांभवी यांचा मृत्यू झाला. बारामती येथील अपघाताच्या वेळी अजित पवारांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव त्यांच्यासोबत होते. विदीप जाधव यांचाही अपघातात मृत्यू झाला. एआयबीची टीम विमान अपघातस्थळाला भेट देऊन चौकशी करेल. ही टीम दिल्लीहून बारामतीला रवाना झाली आहे.

COMMENTS