अहिल्यानगर (प्रतिनिधी) - उत्तरेकडील शीत लहर कमी झाली असून महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ झाली आहे यामुळे थंडीचा कडाका कमी झाला आहे. राज्या...
अहिल्यानगर (प्रतिनिधी) - उत्तरेकडील शीत लहर कमी झाली असून महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ झाली आहे यामुळे थंडीचा कडाका कमी झाला आहे. राज्यात अंशतः ढगाळ हवामान कायम असून, नाशिक, आहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. आज राज्यात ढगाळ आकाश आणि किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सोमवारी उत्तर प्रदेशातील ईटवाह येथे देशातील नीचांकी 2.1 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले, तर कर्नाटकातील कारवार येथे देशातील उच्चांकी 35.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रात कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी 32.5 अंश सेल्सिअस, तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी 9.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. भंडारा येथेही 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान 10 अंशांच्या वर राहिल्याने थंडीचा प्रभाव कमी झाला आहे.रविवारी सायंकाळी दाट धुक्यासह काही जिल्ह्यात हलक्या सरी पडल्या. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रासह मध्य भारतात किमान तापमान 2 ते 3 अंशांनी कमी होऊ शकते, मात्र आज ढगाळ हवामान कायम राहील.

COMMENTS