उद्धव ठाकरेंची शिवगर्जना, मराठी माणसाला विनंती मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी एक आवाहन दिलं की, उद्धव ठाकरेंचं विकासाचं एक भाषण दाखवा त्य...
उद्धव ठाकरेंची शिवगर्जना, मराठी माणसाला विनंती
मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी एक आवाहन दिलं की, उद्धव ठाकरेंचं विकासाचं एक भाषण दाखवा त्यांना मी हजार रुपये देतो. मात्र मला त्यांचा चोरीचा पैसा नकोच. पण देवेंद्र फडणवीस मी तुम्हाला आवाहन देतो की, मोदींपासून ते तुमचं आणि तुमच्या खालच्या चेल्या-चंपाट्यांचं अगदी वर्गातल्या मॉनिटरची निवडणूक असली तरी हिंदू-मुस्लिम नं करता केलेलं भाषण दाखवा आम्ही सर्व मिळून तुम्हाला एक लाख रुपये देतो. अशी बोचारी टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलीय. अहो मेवाभाऊ तुम्ही आम्हाला काय शिकवताय, हे सगळं अडानीकरण चाललंय. आमच्या मुंबादेवीवरुन मुंबईचं नाव ठेवलं आता त्या मुंबईचं नाव बॉम्बे करण्याचा डाव चालला आहे. असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे जमलेल्या तमाम मराठी बांधवांनो आणि भागिनींनो म्हणाला आणि उद्धव ठाकरे जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भागिनींनो म्हणालो, यावरूनच उद्याच्या चर्चा होतील. आम्ही अस्सल मराठी बोलणारो देशभक्त हिंदू आहोत. राज यांनी आज उत्तम मांडणी केली. एवढं पोट तिडकीने सांगितलं, मात्र नुसतं पोटला तड लागून होणार नाही, तर डोक्याला तिडक गेली पाहजे. आणि जर ती जाणार नसेल तर आपल्याला शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
जयंतराव पाटील आज भावकी एक झालीय, गावकीपण एकत्र होतेय. अनेक जण प्रश्न विचारात होते हि ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे का? आमचं अस्तित्व संपवणारं नेतृत्व अजून जन्माला आलं नाही, आमचं अस्तित्व तुमच्या समोर आहे. मराठीसाठी एकत्र आलोय, आमच्यातील वाद आम्ही गाडून एकत्र आलोय आणि मुंबईसाठी, मराठी माणसासाठी आणि हिंदूंसाठी एकत्र आलोय. अशी गर्जनाही उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.
तब्बल 20 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची एकत्र शिवगर्जना झालीय. अवघ्या महाराष्ट्राला उत्सुकता असलेल्या ठाकरे बंधूंची संयुक्त सभा आज शिवतीर्थावर होत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (इचउ एश्रशलींळेप 2026) पार्श्वभूमीवर तब्बल 20 वर्षांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र आले आहे. यावेळी बोलताना ठाकरे बंधूंनी आपल्या खास शैलीत चौफेर फटकेबाजी करत सत्ताधार्यांवर निशाणा साधलाय.
अवघ्या महाराष्ट्राला उत्सुकता असलेल्या ठाकरे बंधूंची संयुक्त सभा आज शिवतीर्थावर होत आहे. तब्बल 20 वर्षानंतर अवघ्या महाराष्ट्राला हे सुखद चित्र बघायला मिळालंय. या सभेस्थळी मनसैनिकांनी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याचे चित्र बघायला मिळालं. महाराष्ट्र धर्माची पताका गाजवत उत्साहात शिवतीर्थावर या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं होतं. या आवाहनाला मनसैनिकांनी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत शिवतीर्थावर गर्दी केल्याचे दिसून आलं. दरम्यान यावेळी बोलताना दोन्ही ठाकरे बंधूनी भाजप, शिवसेनेसह महायुतीवर चौफेर फटकेबाजी केली आहे.
शिवसेना आणि ठाकरे कुटुंबासाठी शिवतीर्थ अर्थात छत्रपती शिवाजी पार्कशी एक भावनिक नातं आहे. सोबतच हे केवळ एक मैदान नव्हे तर या शिवतीर्थांशी ठाकरेंचं मोठं भावनिक आणि ऐतिहासिक नातं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (इचउ एश्रशलींळेप 2026) पार्श्वभूमीवर तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले आहे. त्यानिमित्याने मनसैनिकांचे आणि शिवसैनिकांचे एकप्रकारे कधीकाळचं स्वप्न सत्यात उतरलं आहे. अशातच आता आगामी महापालिकेत पुन्हा ठाकरे बंधूंची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी ठाकरे बंधूनी मराठी मतदारांना भावनिक साद घातली आहे. तब्बल 75 हजार कोटींचं अर्थसंकल्प 2025 च्या सालात जाहीर करण्यात आलं होतं. त्यावरून या माहापालिकेचे केवळ देशातच नव्हे तर आशियाखंडात वेगळं महत्व आहे. त्यामुळे आता मतदार ठाकरे बंधूंच्या या आवाहनाला मतदानातून कौल दातात का, हे पाहणे महत्वाचाही ठरणार आहे.

COMMENTS