यांच्यात क्षमता तरी उरलेय का मुंबई - BMC Election 2026 Voting in Mumbai : महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी साडेअकरा वाजेपर...
यांच्यात क्षमता तरी उरलेय का
मुंबई - BMC Election 2026 Voting in Mumbai:महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत मुंबईत 17.58 टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीत दुबार मतदारांना शोधण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना-मनसे या दोन्ही पक्षांनी मतदार केंद्राबाहेर जोरदार फिल्डिंग लावली होती. दुबार मतदारांना रोखण्यासाठी मुंबईतील अनेक मतदान केंद्रांबाहेर ठाकरे बंधूंनी मभगवा गार्डफ तैनात केले आहेत. मभगवा गार्डफची ही फौज दुबार मतदारांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहे. यापैकी काही मभगवा गार्डफ हे भाजप आमदार आणि पोलिसांना नडल्याचे प्रकारही समोर आले आहेत. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. मुंबईत जे दहशत निर्माण करतील, त्यांना पोलीस ठोकून काढतील, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
ठाकरे बंधूंनी जी भगवा गार्ड ब्रिगेड तयार केली आहे, ती मुंबईतील मालवणी आणि काही भागांमध्ये दिसत नाही. मला एवढचं विचारायचं आहे, त्यांना सिलेक्टिव्ह दहशत निर्माण करायची आहे का? पण मुंबईत कोणीही दहशत निर्माण करु शकत नाही. दहशत निर्माण करण्याची यांची क्षमताच राहिली नाही, असे तुच्छतापूर्ण उद्गार देवेंद्र फडणवीस यांनी काढले. हे काय दहशत निर्माण करणार,यांच्यात काय क्षमता उरलेय? कोणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर पोलीस त्यांना ठोकून काढतील, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
मुंबईत कुठलीच दहशत नाही. कोणालाही लोकांना अडवण्याचा अधिकार नाही. ते दुबार मतदानाचा आरोप करतात, त्यांच्याजवळ काय पुरावे आहेत, त्यांना याबद्दल काय माहिती आहे? दुबार मतदार शोधणे निवडणूक आयोगाचे काम आहे. त्यासाठी मारामार्या करणे ही कोणती पद्धत आहे. मतदान कमी झालं पाहिजे, यासाठी हे सर्व प्रयत्न सुरु आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मतदारांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा आरोप उडवून लावला. निवडणुकांबाबत सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग ठरवतं. याआधीही मार्करचा वापर झाला आहे. जर काही न शंका असेल तर निवडणूक आयोगाने दुसर्या पेनचा वापर केला पाहिजे. मी तर म्हणतो की, ऑईल पेंटचा वापर केला पाहिजे. मात्र निवडणुकीशी संबंधित संस्थानवर अशा पद्धतीने संशय निर्माण करणे योग्य नाही, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. माझ्या हातावरील मार्कर पुसून दाखवा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. DEVENDRA FADNAVIS uddhav ThackerayRaj ThackeryaBMC Election 2026

COMMENTS