महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथचे संकेत ! एकनाथ शिंदे शरद पवारांसोबत अन् उद्धव ठाकरे फडणवीसांसोबत जाणार

2029 च्या लोकसभा निवडणुकीबाबत महत्त्वाचं भाकीत सोलापूर - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्यावेळी म्हणजे 2029 मध्ये महाराष्ट्राच्या राजका...

2029 च्या लोकसभा निवडणुकीबाबत महत्त्वाचं भाकीत





सोलापूर - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्यावेळी म्हणजे 2029 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळतील. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पुन्हा भाजपसोबत (BJP) जाऊ शकतात. तर सध्या सत्तेत असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपले सर्व शिलेदार घेऊन शरद पवार यांच्याशी युती करतील, असा खळबळजनक दावा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केला आहे. ते रविवारी सोलापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे दावे केले. 

आगामी निवडणुकीत म्हणजे 2029 मध्ये एकनाथ शिंदे, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एका बाजूला असतील. तर भाजप आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे दोन पक्ष एकत्र येतील. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जनाधार उरलेला नाही. राज ठाकरे यांनी अनेकदा भूमिका बदलल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी आणखी काही वर्षे तयारी करण्याची गरज आहे, असे मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले. भाजपपासून दूर गेलेले उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा भाजपसोबत आल्याचे चित्र 2029 मध्ये दिसेल असा खळबळजनक दावा हाके यांनी केला आहे. यामुळे महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघेल आणि ह्याची सुरुवात नुकत्याच झालेल्या पंचायत राज निवडणुकीत दिसल्याचे हाके यांचे सांगणे आहे. 

सध्या सुरू असलेल्या पंचायत राज निवडणुकीत ज्या पद्धतीने आघाड्या झाल्या ते पाहता आता नवीन ध्रुवीकरणाला सुरुवात झाली असून 2029 मध्ये होणार्‍या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप हे एकनाथ शिंदे आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या विरोधात एकत्र आलेले दिसतील असे भाकीत हाके यांनी केले आहे. ज्या पद्धतीने शिंदे सेनेचे मंत्री आणि नेते अलीकडच्या काळात वारंवार मुख्यमंत्री आणि भाजपला अडचणीत आणणारे वक्तव्य करताना दिसत आहेत. महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकातही आपला विरोध करण्याची भूमिका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची होती. अनेक ठिकाणी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्याचे चित्रही पाहायला मिळाले होते. 

अजित दादांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेला स्पेस भरून काढण्यासाठी एकनाथ शिंदे जोरदार प्रयत्न करतील. ज्या पद्धतीने त्यांनी पंचायतराज निवडणुकीत राष्ट्रवादीला सोबत घेत भाजपाला विरोध केला होता ते पाहता या तीन पक्षांची आघाडी पुढील निवडणुकीत दिसेल असे भाकीत लक्ष्मण हाके यांनी केले आहे. 

COMMENTS

नाव

"Mental Health Education,2,(Nirmala Sitharaman),1,15 jan,1,19 To 25 January,1,2026,1,2026-27,1,23 JANUARY,1,28 jan 2026,1,31 may,1,8th Pay Commission,1,accident,2,action,1,adcc bank,1,aditi tatkare,1,Ahilyanagar,28,Ajit Pawar,5,Ajit Pawar Funeral,1,AJIT PAWAR PLANE CRASH,2,Amol Mitkari on Ajit Pawar plane crash,1,and BJP Lock Horns,1,arest,1,BARAMATI,2,beed,1,BJP,3,BMC Election 2026,4,BMC Election Results 2026. mayor,1,BOY,1,Breaking,58,BUDGET,1,CAR,1,chandrashekhar bawankule,1,COLD,2,CONDUCTE DROPPED,1,cooking,1,crime,2,deput cm. maharshtra,1,Devendra Fadnav,1,Devendra Fadnavis,3,Devendra Fadnavis BJP,1,DEVENDRA FADNAVIS 'Eknath Shinde,1,Devendra Fadnavis and Uddhav Thackeray,1,dnyadhara malitistate,1,DOG,2,dr sangram patil,1,dry day,1,Eknath Shinde,3,elecation,4,election,5,Election Commission,1,Election Results,1,employee spot games,1,exam,2,Father becomes a devil,1,finger,1,Forecast,1,gold,4,GOVERMENT,2,Government Employee,1,GUJARAT,1,Gulbrao Patil,1,hearing,1,Helpline Number,1,high,2,HOSPITAL,1,India,4,Intensifies as Shinde Camp,1,jalgaon,1,Jarange patil,1,jilha parishad election,1,kavayat,1,kawayat,1,kills daughter,1,kute,1,Ladki Bahin Yojana,2,mahapalika,3,Maharashtra,16,Maharashtra First Women DCM,1,Maharashtra Municipal Corporation Election Result 2026,1,maharashtra politics,2,Maharashtra schools,1,Makar Sankranti 2026 Rashibhavishya,1,mark,1,market,1,meet,1,milk,1,minister gulabrao patil,1,modi post,1,mumbai airport,1,Mumbai Mayor,1,Mumbai Mayor Race,1,Mumbai News Shivsena Uddhav Thackeray,1,municipal,1,nagapur,1,nandurbar,1,NATIONAL,1,Nationalist Congress Party,2,NCP,4,NEW BRAND,1,NEWS,16,ODER,2,officer,1,on hoilday,1,Panchayat Samiti Election,1,plan,1,poliice,1,political news,2,Politics,3,post,1,puja khedkar,1,pune,4,Pune Mahapalika,1,PURCHASE,1,RAIN,1,Raj Thackerya,1,rashibhvishya,1,rate,5,Republic Day,1,result,1,Results,1,revenue minister,1,road show,1,Sanjay Raut on,1,school,5,Sharad Pawar,3,shard pawar,2,shine at national school band competition 2026,1,Silver,1,slary,1,speech,1,ST,1,STATE GOVERMENT,1,strik,1,Sunetra Ajit Pawar,2,Sunetra Pawar,1,supreme court,1,Surya Makar Rashi Pravesh Effect On All Rashi,1,TAX,1,teacher,5,Telangana Election; Promise Horror; Stray Dogs Killed,1,temperature,1,tet,1,training,1,transfer,1,TREATMENT,1,Uddhav Sena,1,uddhav Thackeray,4,uddhav thackeray sabha,1,Union Budget 2026,1,votingn,1,WADIYA PARK,1,weather,3,weekly,1,Weekly Horoscope,1,Zilla Parishad,1,Zilla Parishad Election Date,1,zp,11,ZP Election 2026,1,
ltr
item
महा रिपोर्टर | Maha Reporter: महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथचे संकेत ! एकनाथ शिंदे शरद पवारांसोबत अन् उद्धव ठाकरे फडणवीसांसोबत जाणार
महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथचे संकेत ! एकनाथ शिंदे शरद पवारांसोबत अन् उद्धव ठाकरे फडणवीसांसोबत जाणार
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg8E7ViYQuMqJnfqMAVapdEiMlz8wfKySkCcRpi6v8dCH6xabLb0R5zYgI_jNyljo6yH2bmS_0w4dM2LKhoMQzjeMexyL5c04YWKR-unPDibMQXj62C3PLKZCMhyphenhyphenG1_4uGaB6sFBRuqqp39L_-lh1LKlLffzEgtS4JdOTCKs9qNMM4jiUlyoL4khv55TuY/s320/Maharashtra-Political-Crisis-Live-Sharad-Pawar-Eknath-Shinde-Uddhav-Thackeray-Devendra-Fadnavis-Ajit-Pawar.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg8E7ViYQuMqJnfqMAVapdEiMlz8wfKySkCcRpi6v8dCH6xabLb0R5zYgI_jNyljo6yH2bmS_0w4dM2LKhoMQzjeMexyL5c04YWKR-unPDibMQXj62C3PLKZCMhyphenhyphenG1_4uGaB6sFBRuqqp39L_-lh1LKlLffzEgtS4JdOTCKs9qNMM4jiUlyoL4khv55TuY/s72-c/Maharashtra-Political-Crisis-Live-Sharad-Pawar-Eknath-Shinde-Uddhav-Thackeray-Devendra-Fadnavis-Ajit-Pawar.jpg
महा रिपोर्टर | Maha Reporter
https://www.mahareporter.in/2026/02/blog-post_26.html
https://www.mahareporter.in/
https://www.mahareporter.in/
https://www.mahareporter.in/2026/02/blog-post_26.html
true
4985032059625918012
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content