नराधम अशोक खरातवर अत्याचाराचा आणखी गुन्हे दाखल नाशिक - नाशिकमध्ये स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्याविरोधातील प्रकरण अधिकच गंभीर बनत चा...
नराधम अशोक खरातवर अत्याचाराचा आणखी गुन्हे दाखल
नाशिक - नाशिकमध्ये स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्याविरोधातील प्रकरण अधिकच गंभीर बनत चालले आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये आधीच अटकेत असलेल्या खरातविरुद्ध आता आणखी नवीन गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाणे येथे हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, तपासादरम्यान आणखी काही भयावह बाबीही उघड झाल्या आहेत. लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी नकली साप आणि वाघाचे कातडे वापरून अघोरी विधी केल्याचा आरोपही खरातवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात लैंगिक अत्याचारासोबतच महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या नव्या गुन्ह्यामुळे विशेष तपास पथकाच्या चौकशीला आणखी वेग आला असून आधीच समोर आलेल्या 100 हून अधिक कथित व्हिडिओंनंतर आता पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणा सर्व बाजूंनी पुरावे गोळा करत असून, खरातच्या तथाकथित अध्यात्मिक जाळ्याचा मोठा भांडाफोड होण्याची चिन्हे दिसत आहेत.
दुसरीकडे पीडित महिला गर्भवती असताना पूजा विधीच्या नावाखाली खरातने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर या प्रकाराची माहिती बाहेर दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही उल्लेख तक्रारीत आहे. महिलेसोबत येणार्या तिच्या पतीला बाहेर बसवून, आतमध्ये उपचारफ किंवा विधीच्या नावाखाली अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तपासादरम्यान आणखी काही भयावह बाबीही उघड झाल्या आहेत. लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी नकली साप आणि वाघाचे कातडे वापरून अघोरी विधी केल्याचा आरोपही खरातवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात लैंगिक अत्याचारासोबतच महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच इछड कलम 64(1), 74 आणि 351(2) अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या नव्या गुन्ह्यामुळे विशेष तपास पथकाच्या (डखढ) चौकशीला आणखी वेग आला असून, आधीच समोर आलेल्या 100 हून अधिक कथित व्हिडिओंनंतर आता पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणा सर्व बाजूंनी पुरावे गोळा करत असून, खरातच्या तथाकथित ङ्गअध्यात्मिकफ जाळ्याचा मोठा भांडाफोड होण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, अशोक खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांनी पुढे येत तक्रार नोंदवण्याची तयारी दर्शवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या तिन्ही महिलांना विश्वासात घेऊन त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी गोपनीय पद्धतीने चौकशी करण्यात येत आहे. विशेष तपास पथक या महिलांचे जबाब अत्यंत संवेदनशीलतेने नोंदवत असून, नव्या साक्षींमुळे खरातविरोधातील पुरावे अधिक मजबूत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या तीन दिवसांपासून गुन्हे शाखा कार्यालय आणि पोलीस क्लब येथे अशोक खरातची चौकशी सुरु होती. मात्र, आज रविवारी एसआयटीने चौकशीचे ठिकाण अचानक बदलले असून खरातला अज्ञातस्थळी हलवले आहे. या कारवाईदरम्यान प्रचंड गोपनीयता आणि खबरदारी घेतल्याची माहिती समोर येत आहे. या चौकशीला एसआयटी प्रमुख आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते स्वतः उपस्थित राहून तपासावर बारकाईने लक्ष ठेवत आहेत. कालच खरातची तब्बल सात तास चौकशी करण्यात आली होती, तर आजही त्याची सखोल चौकशी सुरू आहे. तसेच खरातच्या ङ्गईशान्येश्वरफ मंदिरातील पुजारी आणि काही कर्मचार्यांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी आणण्यात आले आहे. या चौकशीमधून मंदिर आणि खरातच्या फार्महाऊसवर नेमक्या कोणत्या प्रकारच्या हालचाली सुरू होत्या, याचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS