मुंबई : राज्यातील शेतकर्यांसाठी मोठी बातमी असून दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचा अर्थसंकल्प मांडताना मुख्यमं...
मुंबई : राज्यातील शेतकर्यांसाठी मोठी बातमी असून दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचा अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची घोषणा केली. पुण्यबाई अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत ही कर्जमाफी करण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं आहे.
30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकर्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. तसेच जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात, त्यांच्यासाठी 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे.
कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र?
- दोन लाख रुपयांपर्यंतची थकबाकी असलेले शेतकरी.
- ज्यांचं पीककर्ज थकलेलं आहे असे शेतकरीच पात्र असतील.
- 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले कर्ज माफ होणार.
- नियमित कर्जपरतफेड करणार्या शेतकर्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ.
बजेटमधील शेतीसाठीचे महत्त्वाचे मुद्दे
शेतकर्यांचं दोन लाखांपर्यंतचं पीककर्ज माफ, 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या पात्र शेतकर्यांना लाभ.
* नियमित कर्जपरतफेड करणार्या शेतकर्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन
* गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजूरांचा सहभाग करणार.
* पाणंद रस्त्यांना मान्यता दिली आहे.
* 30 लाखांहून अधिक शेतकर्यांना हवामान, बाजारभाव माहिती दिली जात आहे.
* चारही कृषी विद्यापीठात एआयजी मदत घेतली जात आहे. शेतकर्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे.
* अॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे.
* 1 कोटी 31 लाख फार्मर आयडी फेब्रुवारी पर्यंत झाले आहे.
* चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील.
* आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात.
* गोपीनाथ मुंडे मंडळात आता शेतमजुरांचा ही समावेश करणार
* महिला गोपालक, शेळी पालकांसाठी विशेष योजना राबविण्यात येईल.

COMMENTS