चंद्रशेखर घुले पाटील; नववर्षाची अर्थभरारी सुरूवात अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भक्कम आर्थिक पायावर उभी आहे. बँके...
चंद्रशेखर घुले पाटील; नववर्षाची अर्थभरारी सुरूवात
अहिल्यानगर (प्रतिनिधी)-
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भक्कम आर्थिक पायावर उभी आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती अतिशय सुदृढ असून जिल्हा बँकेवर ठेवीदार, शेतकर्यांचा असल्याने नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2025 ला जिल्हा बँकेच्या ठेवींनी 11 हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. बँकेची नववर्षातील मोठी भरारी असून या पुढे जिल्हा बँक अशा प्रकारे आर्थिक क्षेत्रात भरारी घेणार असल्याचा विश्वास बँकेचे चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील यांनी व्यक्त केला.
जिल्ह्याच्या विकासासाठी शेतकरी केंद्रबिंदू मानून जिल्हा बँकेचे संचालक मंडळ आणि अधिकारी कर्मचारी हे नेहमीच तत्परतेने कामकाज करत आहेत. यामुळे आणि जिल्ह्यातील सर्वसामान्यांचा विश्वास बँकेवर असल्याने बँकेची प्रगतीची घोडदौड अतिशय वेगाने चालू आहे. बँकेच्या ठेवीवरील व्याजदर हा अतिशय चांगला असून बँकेमध्ये ठेवी सुरक्षित असल्याचा विश्वास ठेवीदारांमध्ये वाढत असल्याने बँकेमधील ठेवींचा ओघ वाढतांना दिसत आहे. याबाबत अधिक माहिती देतांना चेअरमन घुलेपाटील यांनी सांगितले, जिल्हा बँकेने आता ग्राहकांसाठी सोने तारण कर्जामध्ये जास्तीतजास्त ग्राहकांना फायदा होण्यासाठी अल्प दरात म्हणजेच 8 टक्के व्याजदराने व प्रतितोळा 82 हजार रकमे इतका आणि प्रति व्यक्ती 5 लाख कर्ज मर्यादाप्रमाणे सोनेतारण कर्ज उपलब्ध केले आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यांत जिल्हा बँकेचे सोने कर्जात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेले आहे. सध्या बॅकेच्या 93 शाखामध्ये सोनेतारण कर्ज सुविधा उपलब्ध असून नजीकच्या काळात 160 शाखांमध्ये सोनेतारण कर्ज उपलब्ध करणार असल्याची माहिती चेअरमन घुले पाटील यांनी दिली. बँकेने नुकतेच महावितरणचे बिल पेमेंट घेण्यासाठी ग्राहकांना क्यूआर कोड उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्यातील व्यापारी, ग्राहक, सहकारी संस्था, ग्रामपंचायत, शाळा, कॉलेज, खाजगी संस्था आदींनी जिल्हा बँकेचा क्यूआर कोड घेऊन व्यवहार सुरक्षित आणि जलद उपलब्ध करून घेण्याचे आवाहन चेअरमन घुले पाटील यांनी केले.
..............
बँक आता आधुनिक तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत असतांना लवकरच अहिल्यानगर येथील मुख्य कार्यालयाच्या इमारतीमध्ये 24 तास आणि सातही दिवस स्वयंचलित बँकिंग सेवा देण्यासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या ईलॉबीमध्ये एटीएम, कॅश डिपॉझिट मशीन, पासबुक प्रिंटर, चेक डिपॉझिट मशीन, तक्रार नोंदणी सुविधा इत्यादी सेवा एकाच ठिकाणी ई-लॉबीमार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या ईलॉबीचे काम प्रगतीपासून पथावर असून लवकरच त्याचे उद्घाटन करणार असल्याची माहितीही बँकेचे चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील यांनी दिली.
....................

COMMENTS