13 ते 16 जानेवारीपर्यंत मद्यपानास मनाई मुंबई - राज्यात महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणाऱ आहे. प्रचाराच्या तोफा 13 जानेवारील...
13 ते 16 जानेवारीपर्यंत मद्यपानास मनाई
मुंबई - राज्यात महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणाऱ आहे. प्रचाराच्या तोफा 13 जानेवारीला थंडावणार आहेत. राजकीय पक्षांकडून, नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान, प्रशासनाची निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आता नागरिकांसाठी प्रशासनाने काही नियम जारी केले आहेत. मंगळवार 13 जानेवारी ते 16 जानेवारी या कालावधीत राज्यात जिथं महापालिका निवडणुका आहेत तिथं ड्राय डे लागू करण्यात आला आहे.
प्रचाराची सांगता होताच मंगळवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून राज्यात जिथं जिथं महापालिका निवडणूक आहे तिथं दारू दुकाने बंद राहणार आहेत. राज्यात 29 महानगरपालिकांची निवडणूक होत आहे. यात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर यांसारख्या महानगरपालिकांचा समावेश आहे. पुढील चार दिवस या महानगरपालिकांच्या हद्दीत ड्राय डे लागू असेल.
निवडणूक काळात शांतता, सुरक्षितता आणि शिस्त राखण्याच्या दृष्टीनं प्रशासनाकडून योग्य ती पावलं उचलली जात आहेत. मद्यपानाला बंदी घातल्यानं मतदानावेळी मतदारांना सुरक्षित वातावरण मिळेल. निवडणूक संबंधी गैरप्रकार, गोंधळ, दंगल टाळता येईल यासाठी ड्राय डे घोषित कऱण्यात आले आहेत. यासंदर्भात दुकानदारांना पूर्वकल्पना देण्यात आलीय. सार्वजनिक ठिकाणी पोलीस आणि प्रशासनाकडून गस्त वाढवण्यात येणार आहे. निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या हद्दीत 13 ते 16 जानेवारी या कालावधीत ड्राय डे लागू असणार आहे.

COMMENTS