पाच गावांच्या सरपंचांसह सहा जणांवर गुन्हा दाखल तेलंगणा - निवडणुकीत दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी जवळपास 500 कुत्र्यांची हत्या करण्यात आल्...
पाच गावांच्या सरपंचांसह सहा जणांवर गुन्हा दाखल
तेलंगणा - निवडणुकीत दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी जवळपास 500 कुत्र्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. Telangana Election Promise Horror तेलंगणाच्या कामारेड्डी जिल्ह्यातील पाच गावात हा प्रकार घडला आहे. गावांतील सरपंचांनी लोकांना दिलेलं वचन पाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं आहे. एकाच आठवड्यात 500 कुत्र्यांची हत्या ( Stray Dogs Killed)करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित गावात 500 कुत्र्यांना विष देऊन ठार मारण्यात आलं आहे. प्राणी कल्याण कार्यकर्ते अदुलापुरम गौतम यांनी 12 जानेवारी रोजी दाखल केलेल्या तक्रारीत कामारेड्डी जिल्ह्यातील भवानीपेट, पालवंचा, फरीदपेट, वाडी आणि बंदारमेश्वरपल्ली या गावांसह इतर ठिकाणी भटक्या कुत्र्यांची नियोजनबद्ध पद्धतीने हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांतच सुमारे 200 कुत्र्यांची हत्या करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
याप्रकरणी आता पाच गावातील सरपंच आणि अन्य एका अन्य व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिकार्यांनी सांगितले की, श्वानांचे मृतदेह गावांच्या बाहेरील भागात पुरण्यात आले होते आणि नंतर पशुवैद्यकीय पथकांनी शवविच्छेदन तपासणीसाठी ते बाहेर काढले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच मृत कुत्र्यांची संख्या वाढू शकते, अशी शक्यताही पोलिसांनी वर्तवली.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकांदरम्यान काही उमेदवारांनी गावकर्यांना भटक्या कुत्र्यांच्या त्रासातून मुक्त करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार त्यांनी या कुत्र्यांना ठार मारल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर चांगली खळबळ उडाली असून याप्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्राणी मित्रांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS