मल्टीस्टेट बँक घोटाळ्यातील आरोपी; नगरमधील हजारो लोकांच्या ठेवी अडकल्या बीड - ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले मुख...
मल्टीस्टेट बँक घोटाळ्यातील आरोपी; नगरमधील हजारो लोकांच्या ठेवी अडकल्या
बीड - ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले मुख्य आरोपी सुरेश कुटे व त्यांची पत्नी अर्चना कुटे यांना केज येथून बीड येथे घेऊन जात असताना पोलिस व्हॅनचा अपघात झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी नेकनूर-येळंब रस्त्यावर सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. दरम्यान, या संस्थेत नगर जिल्ह्यातील हजारो लोकांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत.
शनिवार (दि. 17) रोजी ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले मुख्य आरोपी सुरेश कुटे व त्यांची पत्नी अर्चना कुटे यांना केज येथून बीड येथे घेऊन जात असताना पोलिस व्हॅनचा अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला तर अर्चना कुटे यांनाही दुखापत झाली. त्यांच्यावर वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच नेकनुर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातामुळे काही काळ नेकनूर-येळंब रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत केली. या घटनेची नोंद नेकनूर पोलीस ठाण्यात करण्यात येत असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

COMMENTS