सोन्याच्या दरात तेजी कायम, सामन्यांना मोठा धक्का मुंबई - मकर संक्रातीच्या मुहुर्तावर सोनं आणि चांदीच्या किमती तुफान वाढलेल्या पाहायला...
सोन्याच्या दरात तेजी कायम, सामन्यांना मोठा धक्का
मुंबई - मकर संक्रातीच्या मुहुर्तावर सोनं आणि चांदीच्या किमती तुफान वाढलेल्या पाहायला मिळाल्या. सोन्यापेक्षा चांदीच्याGold And Silver Rate किमंतीने बुधवारी बाजी मारलेली दिसली. आता सोने आणि चांदीचे रेट वाढताना पाहून गुंतवणूकदार मात्र खूपच खुश झाले असतील. खरेदीदारांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण दिसत आहे. काल चांदीच्या किमतीत मोठे उलटफेर दिसल्यानंतर गुरूवारी दागिन्यांच्या किमती किती आहे ते पाहा...
आता आजही सोन्याचा आणि चांदीचा वायद्याची किमत वाढलेली दिसत आह. आता आज सोन्याच्या वायद्यची किमत 1,43,809 रुपये आहे. किमतीत आज 800 रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या वायद्याची किमत 1100 रुपयांनी वाढली आहे. चांदीच्या वायद्याची किमत ही 2,86,948 रुपये आहे. सोन्याच्या आणि चांदीच्या किमती अचानक वाढलेल्या दिसत आहे कारण जागतिक तणाव वाढलेला दिसत आहे. चांदीच्या किमतीने काल किमतीच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड मोडलेले दिसले.
अमेरिका व्हेनेझुएल संघर्ष असो किंवा अमेरिक आणि इराणमधील संघर्ष असो यामुळे सोन्याच्या आणि चांदीच्या किमती वाढताना दिसत आहे. या वर्षी सोने आणि चांदीच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमागील कारणांबद्दल, परदेशी गुंतवणूकदारांची विक्री तसेच अमेरिका आणि इराणमधील वाढता तणाव हे महत्त्वाचे घटक मानले जाऊ शकतात. सामान्यतः, जागतिक तणाव वाढत असताना, गुंतवणूकदार सुरक्षित आश्रयस्थान म्हणून सोने आणि चांदीकडे वळतात. धातूच्या किमतीत ही वाढ वाढत्या भू-राजकीय तणावामुळे झाली आहे. याचा परिणाम पूर्ण जगावर होताना दिसत आहे. सराफा बाजारातही किमती वाढलेल्या दिसत आहे. आज 22 कॅरेट सोन्याची किमत ही 1,32,010 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याची किमत ही 1,44,010 रुपये आहे. सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या किमती वाढत असल्यामुळे मागील वर्षापासून ग्राहक चिंतेत आहे. मागील वर्षी ही गुंतवणूकदारांना सोनं आणि चांदीमधूनGold And Silver Rate जोरदार रिटर्न मिळाला. आता यंदाही वर्षाची सुरुवातच जोरदरा झाली आहे. गुंतवणूकदारांना या वर्षाच्या सुरुवातीपासूनच चांगले दिवस आलेले दिसत आहे.

COMMENTS